Breaking News

कधीच पाहिली नसेल अशी जिल्हा परिषदेची शाळा

कधीच पाहिली नसेल अशी जिल्हा परिषदेची शाळा          



कुसुम सोलार योजना


            आपण रोज कोणत्या ना कोणत्या योजनेविषयी, शासन निर्णायविषयी किंवा कायद्याविशी किंवा शेतकर्‍याच्या आणि सर्व सामन्याच्या फायद्याच्या गोस्टीविषयी माहिती तुम्हाला देत असतोत आज अशाच एक चांगल्या होतकरू शिक्षकाची व त्या शिक्षकाने केलेल्या एक आगळ्यावेगळ्या कामाविषयी माहिती देणार आहोत त्यासाठी ही माहिती तुम्ही वाचून पाहावी.

            ही माहिती आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरर तालुक्यातील वाबळेवाडी गावाची तेथील शिक्षकाची आणि त्यांनी निर्माण केलेल्या जिल्हा परिषद शाळेची जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून जवळजवळ 3 ते 4 हजार विद्यार्थी  प्रतीक्षा यादीमध्ये असतात. ही शाळा जगातल्या तिसर्‍या नंबरची व भारतातील पहिल्या नंबरची ‘झिरो एनर्जी स्कूल’ म्हणून वाबळेवाडीची  शाळा नावारूपाला आली आहे. या वाबळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला बँक ऑफ न्यूयॉर्कचे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी येऊन गेले. ही शाळा जिल्हा परिषदेची शाळा आहे पण या शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागते. सध्या शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत.

            एक काळ असा होता की, पडक्या दोन खोल्यामध्ये ही शाळा चालू होती ही शाळा आज जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सर्वांत मोठ्ठी आदर्श शाळा ठरली आहे. आणि हे सर्व घडवून आणण्यास किंवा घडवण्यास कारणीभूत आहेत ते तेथील जिल्हा परिषद शिक्षक वारे गुरुजी. ही बाब जितकी शाळेच्या विकासाची आहे तितकीच एका शिक्षकाने ठरवले तर शिक्षणक्षेत्रात आपण काय करू शकतो, हे दाखऊन दिले आहे. वाबळेवाडी हे गाव शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आहे.    वाबळेवाडी म्हणजे जवळपास पन्नास ते साठ घरांचे छोटेसे गाव. या गावाची लोकसंख्या साडेतीनशेच्या आसपास काही वर्षांपूर्वी गावची जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे फक्त दोन गळक्या आणि पडक्या खोल्या, नाविलाजाने याच दोन गळक्या आणि पडक्या  खोल्यांमध्ये तेथील मुले शिक्षण घेत होती.

            कालांतराने 2012 साली बदली होऊन एक नवीन शिक्षक आले त्यांचे नाव होते वारे गुरुजी. शाळेची तसी परिस्थिति पाहून एखाद्या शिक्षकाने या शाळेवरून दुसरीकडे बदली करून घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले असते. पण वारे गुरुजीनी असे न करता     वारे गुरुजींनी विद्यार्थांना शिकवण्यास सुरुवात केली. ते हमेशा नवीन आव्हाने घेण्यासाठी सज्ज असतात म्हणुल ओळखले जायचे. तेथील दोन छोट्या खोल्या. त्यामध्ये दोन शिक्षक आणि सर्व वर्गाची मुले एकत्रच असायचे, असं एकंदरीत तेथील वातावरण होते. हे परिस्थिति बदलण्यासाठी वारे गुरुजींनी 15 ऑगस्ट 2012 मध्ये वाबळेवाडीच्या ग्रामसभेत शाळा जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी किंवा ही शाळा एक मॉडेल बनवण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करायला भाग पडणारा एक आराखडा मांडला.

            शाळेच्या विकाससाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन काम करायचे, असा तो ठराव होता. 2012 साली गावात बरेच महिला बचत गट होते. या महिला बचत गटांनी एक गोष्ट ठरवली. ती म्हणजे पुढची तीन वर्षे बचत गटाला जो काही नफा होईल तो सर्व नफा शाळेच्या विकास कामासाठी द्यायचा. थोडे थोडे पैसे गोळा करून संसार उभा करणार्या महिलांच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट फार मोठी बाब आहे. महिला बचत गटाचा हा निर्णय पाहून गावातले तरुण सुद्धा शाळेच्या विकासाला लागणार्‍या मदतीसाठी समोर आले. नवरात्र आणि गणेशोत्सवांसारख्या सणावर होणारा खर्च त्या सणावर न करता तो पैसा शाळेसाठी दान द्यायचा अस ठरवण्यात आलं. ही शाळा एव्हढी मोठी शाळा होण्याच  मुख्य कारण म्हणजे संपूर्ण गाव आणि शाळा एकत्र आली. शिक्षक एव्हढे चांगले प्रयोग करत आहेत म्हणून शाळेची विद्यार्थिसंख्यादेखील वाढू लागली.

            गावात यात्रेनिमित्त तमाशा आयोजित करण्यात आला होता. सुमारे सव्वा लाख रुपये यात्रा कमिटीमार्फत तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. वारे गुरुजींनी यात्रा कमिटीची भेट घेतली, तेव्हा यात्रा कमिटीने तत्काळ 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम वारे सरांना देण्याचे मंजूर केले. त्या रकमेतून वारे सरांनी विद्यार्थांसाटी टॅब घेतले. महाराष्ट्रातील पहिले ‘टॅब स्कूल’ म्हणून या शाळेचा उल्लेख करावा लागेल. हे पैसै तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. ते खर्या अर्थाने सत्कारणी लागले. आज शाळेची जी इमारत आहे ती गावकर्यांनी दिलेल्या जागेवर आहे. नवीन खोल्या बांधाव्यात म्हणून वारे सरांनी गावकर्यांपुढे आपले म्हणणे मांडले. गावकर्यांनीदेखील सुमारे दीड एकर शेती शाळेसाठी बक्षीसपत्र करून शाळेच्या नावावर केली.


             शाळेमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी झाले. तरीही खैरे सर आणि वारे सर असे दोनच शिक्षक विद्यार्थांना शिकवण्याचे काम करत होते. सर्व इयत्तांच्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी दोघांनी मिळून अभिनव अशा संकल्पना सुरू केल्या. दहा-दहा विद्यार्थांचे गट तयार करून त्यांना वरच्या वर्गातील एक विद्यार्थी विषय-मित्र म्हणून देण्यात आला. छोटे प्रयोग करून विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आल्या. शाळेची कीर्ती सर्वदूर पोहोचू लागल्यानंतर एक दिवस बँक ऑफ न्यूयॉर्कचे काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले. त्यांनी शाळेला देणगी देण्याची भावना बोलून दाखवली. नक्की कोणत्या प्रकारची शाळा हवी, असे विचारल्यानंतर वारे सरांनी त्यांना शाळेचे डिझाइन दाखवले. नव्याने शाळेची रचना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाची मिळतीजुळत्या अशा ‘झिरो एनर्जी स्कूल’ची निर्मिती करण्यात आली.

            जपान आणि आयर्लंडनंतर जगातली ही तिसरी शाळा ठरली. अनुभवातून शिक्षण देण्याचे सूत्र शाळेने स्वीकारले. दिवाळीच्या सुट्टीत मुलांना पोहायला शिकवण्याची जबाबदारीदेखील शाळेने घेतली. संगीत, नाटक, अशा कला क्षेत्राच्या प्रत्येक गोष्टीत विद्यार्थांची रुची वाढवण्यात आली. मुलांनी श्रमसंस्कार मिळावेत म्हणून पंचक्रोशीत झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातूनच गावाच्या परिसरात सुमारे एक लाख झाडांची लागवड करण्यात आली. शाळेची ही सर्व यशस्वी वाटचाल पाहून राज्य सरकारकडून दहा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आज शाळेत बारा शिक्षक आहेत व नववीपर्यंतचे वर्ग आहेत. भविष्यात ही शाळा 12 वी पर्यंतचे शिक्षण देण्यात आहे. 12 वी पर्यंतचे शिक्षण देणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषदेची ही शाळा असण्याचा सन्मान वाबळेवाडीच्या शाळेला मिळणार आहे.  या शाळेत सहाशे च्या आसपास विद्यार्थी संख्या आहे आणि तीन चार हजार विद्यार्थ्यांची या शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. सर्वात विशेष म्हणजे ही शाळा आजही मराठी माध्यमाची शाळा आहे.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...