राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांचा सतर्कतेचा इशारा!
राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांचा सतर्कतेचा इशारा!
जिल्हा परिषद पद भरती
राज्यातच नाही तर संपूर्ण भारतात नावारूपाला आलेले हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील तारखांना राज्यात पावसाळ्यासारखा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे हवामाना अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितले आहे.
महत्त्वाची योजना
हवामान अभ्यासक पंजाबराव डोके यांनी राज्यातील सर्वांनी 24 एप्रिल 2023 ते 2 मे 2023 ही दहा दिवस मोठ्या प्रमाणात विजा भरपूर वारे पाऊस आणि गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे म्हणून राज्यातील शेतकऱ्यांनी या होणाऱ्या आपत्ती पासून स्वतःची व आपल्याकडे असणाऱ्या गाई म्हशी शेळी मेंढी बैल यासारख्या इतर सर्व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
शेतात असलेल्या पिकांची जमेल तशी काळजी घ्यावी कारण 24 एप्रिल पासून राज्यात भाग बदलत दोन मे पर्यंत दहा दिवस पाऊस पडणार आहे. हा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे जे असतील ते वेगवेगळे कामे करून घ्यावीत असेही हवामान अभ्यासक डक म्हणाले.
विभागानुसार पाऊस पडण्याच्या तारखा
➤ पूर्व विदर्भ - दि. 21,22,23,24,25,26,28,29, या तारखांना तुरळक भागात दररोज भाग बदलत पाउस पडेल काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ होण्याची शक्यता असेल.
➤ उत्तर महाराष्ट्र - दि. .22,26,27,28,29,30 वरील तारखेला भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी.
➤ मराठवाडा - दि . 25,26,28,29, 30 या तारखेत मराठवाडा या भागात भाग बदलत काही ठिकाणी गारपिठ , वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विजा देखील भरपूर दिसतील त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपले व आपल्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत सतर्क राहून रक्षण करण्याची काळजी घ्यावी.
➤ दक्षिण व प. महाराष्टू - दि .26,27,28,29,30 दरम्याण काही ठिकाणी वेगवेगळ्या भागात गारपिठ, वारे ,विजा, पाउस असेल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी या गोष्टीची योग्य ती काळजी घ्यावी.
➤ प. विदर्भ - दि .25,26,26,28,29,30 या तारखेत पश्चिम विदर्भ या भागात भाग बदलत काही भागात गारपिठ . कुठे वारे कुठे पाउस असेल . त्यामुळे याची पण या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
ज्यांनी कोणी गारपिठ काय असते आणि गारपीठ कसी होते कधी पाहिली नसेल त्यांना गारपीठ पहायला मिळण्याचा अंदाज आहे.
महत्वाची टीप ;-
शेवटी अंदाज आहे. अचानक वारे वाहण्यात बदल झाला की, वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते त्यामुळे काही अंदाज चुकू शकतात माहीत असावे.
No comments