Breaking News

मुलगी जन्माला आली सरकार देणार एक लाख रुपये.

मुलगी जन्माला आली सरकार देणार एक लाख रुपये. 

 



"माझी कन्या भाग्यश्री योजना"


योजने विषयी माहिती

        माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात जन्माला येणार्‍या  प्रत्येक मुलीच्या नावे महाराष्ट्र सरकार रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून त्या मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम सरकारकडून त्या मुलीस देण्यात येईल.

जिल्हा परिषद पद भारती

  महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे जन्म दर मोठ्या प्रमाणात खाली गेल्यामुळे सरकारने घेतलेला मोठा निर्णय आहे. मुलीचे शिक्षण, आरोग्य व मुलीच्या जन्माबदल समाजामध्ये असलेली नकारात्मा यामध्ये सुधारणा करण्याकरिता व मुलीच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद कारण्याकरिता, मुलींची भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार वाढवणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात शासनाने  2014  साली  “सुकन्या” योजना सुरु केली आहे. सुकन्या योजनेचे लाभ दिनांक 01 जानेिारी, 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता लागू आहेत.

डक यांचा सतर्कतेचा इशारा

तसेच केंद्र शासनाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरु केलेली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये सदर योजना लागू करण्यात आली आहे. या केंद्राने  लागू केलेल्या योजनेमध्ये महाराष्ट्रातील मुलीचा जन्म दर कमी असलेल्या दहा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे ते जिल्हे बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरांगाबाद, वाशीम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात मुलींचा जन्मदर 1000 मुलाांच्या मागे 894 इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन व त्याबाबतचा शासनाने निर्णय घेऊन “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना राबविण्याची बाब शासनाच्या लक्षात आली होती त्यानुसार ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील म्हणजे  दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी "सुकन्या” योजनेचे लाभ कायम ठेऊन त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे होईपर्यंत खाली दिल्याप्रमाणे अधिकचे लाभ देण्यासाठी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.

माझी कन्या भाग्यश्री” या योजनेमध्ये पुढील प्रकारच्या लाभार्थ्यांना योजनेचे लाभ देण्यास पात्र राहतील.

➤ एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. या योजनेसाठी हे लाभार्थी पात्र राहतील. 

➤ एक मुलगी आहे आणि मातेने दुस-या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र राहणार नाहीत.

‘माझी कन्या भाग्यश्री' या योजनेमध्ये  या आधीच्या “सुकन्या' योजनेच्या  लाभामध्ये काही बदल न करता जास्तीचे लाभ देण्यात येतील.

योजनेची उद्दिष्टे

➤लिंग परीक्षण करण्यावर बंधी घालणे किंवा थांबवणे 

➤मुलीचा जन्म दर वाढवून मुलामुलीमध्ये समानता आणणे 

➤मुलींच्या जीवनाच्या सुरक्षेबद्दल खात्री देऊन मुलीसाठी होणार्‍या खर्चाला थोडा हातभार लावणे 

➤मुलगा - मुलगी समान दर्जा देऊन मुळीच्या शिक्षणासाठी समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण          करणे

➤ मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे

➤ सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक संस्था व स्थानिक स्तरावरील                कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत गट, व युवक मंडळ        यांचा सहभाग घेणे.

➤जिल्हा, तालुका, व विविध संस्था व सेवा देणारे यांचा समन्वय घडवून आणणे 

या सर्व प्रकारचे उद्देश समोर ठेऊन शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना चालू केली आहे व या योजनेचा मुलीच्या जन्मदर वाढण्यासाठी  चांगली मदत मिळणार आहे. 

या योजनेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी ग्रामपंचायत किव्हा पंचायत समिती यांच्याशी संपर्क करा 




No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...