शेतकऱ्यांसाठी सरकारची महत्त्वाची योजना.
शेतकऱ्यांसाठी सरकारची महत्त्वाची योजना.
"शेतकर्याच्या जनावरासाठी शासनाकडून मिळणार गाय गोठा"
शासनाच्या लाभदायक योजनाकेंद्र सरकार देशातील जनतेच्या कल्याणासाठी विविध जनहिताच्या योजना राबवीत आहे किंवा असते ह्या योजना शेतकरी शेतमजूर आणि इतर रोजंदारीने मजुरी करणारे मजूर व सर्व देश वासीयांसाठी या योजनेचा फायदा होत असतो.
त्यापैकीच एक योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना/कायदा ही योजना देशातील शेतकरी व रोजंदारीने काम करणारे मजूर यांच्यासाठी फायद्याची योजना ठरत आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाभाचे कामे यामधून शेतकऱ्यांना घेता येतात. तसेच ज्या गावांमध्ये मजुरांच्या हाताला काम मिळत नाही त्या गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटतो म्हणून ही योजना देशातील शेतकरी व गोरगरीब यांच्या हाताला काम मिळत नाही यांच्यासाठी फार महत्त्वाची ठरत आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना मिळणारा लाभ किंवा सार्वजनिक कामावर होणारा खर्च हा केंद्र व राज्य सामूहिकरीत्या करत असते.
अलीकडील काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची एक योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मधून शेतकऱ्यांसाठी गाय गोठा बांधकाम करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ही योजना जोडली आहे. या योजनेमुळे गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या जनावरांना निवारा करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
राज्य शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी कल्याणकारी योजना राबवत असते त्यातीलच राज्य सरकारने सुचवलेली ही एक योजना आहे यामध्ये पात्र शेतकऱ्यांना व पात्र असणाऱ्या मागेल त्या शेतकऱ्यांना त्यासाठी गाय गोठा देण्याची शासनाचे नियोजन आहे.
राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई म्ह शी शेळी असे वेगवेगळ्या प्रकारचे जनावरे असतात परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे त्यांच्या राहण्यासाठी किंवा निवाऱ्यासाठी पक्क्या स्वरूपाचे कुठलेच साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांच्याकडील असलेल्या जनावरांचे उण, वारा, पाऊस, व वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती पासून ते त्या जनावरांचे संरक्षण करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्याकडील असलेल्या जनावर हे बऱ्याच वेळा वरील प्रकारच्या वेगवेगळ्या आपत्तीमुळे मरण पावतात व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते किंवा आर्थिक हानी होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेला जोडून गाय गोठा ही योजना शेतकऱ्यांसाठी अमलात आणली त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची ठरत आहे या योजनेमधून मागेल त्या पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी पक्क्या स्वरूपाचा गोठा किंवा सेड बनवण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व राज्य सरकार यांच्या एकत्रीकरणातून ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना गाय गोठा तर उपलब्ध होणारच आहे परंतु ग्रामीण भागातील रोजगार उपलब्ध नसलेल्या कामगारांसाठी ही योजना फार महत्त्वाची ठरत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात असलेल्या मजुराचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मदत होते.या योजनेमुळे ग्रामीण भागातील मजूराला त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे त्यांना रोजगारासाठी कोठेही जाण्याची गरज भासत नाही .
गाय गोठा अनुदानासाठी या योजनेची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी पूर्ण माहिती वाचा
आपण शासनाच्या विविध योजना पाहत असतो पण आज आपण शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना काय आहे त्याचे उद्दिष्ट काय आहे व त्याचे शेतकऱ्याला व ग्रामीण भागातील मजुरांना होणारे फायदे काय आहे आणि त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे व शेतकऱ्यांना ही योजना घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
या योजनेचे नाव आहे गाय गोठा अनुदान योजना या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2021 पासून करण्यात आली आहे. ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ला जोडून महाराष्ट्र सरकारने चालू केली आहे या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी निवारा करण्यासाठी होतो.
या योजनेचे उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी मोठा किंवा शेड बांधून त्यांच्या जनावरांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती पासून वाचवून शेतकऱ्यांना जनावरे पाळण्यास प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे अर्ज करावयाचा आहे आणि या योजनेसाठी पात्र असलेले सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून तो अर्ज ग्रामपंचायत कडे दाखल करावा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या जनावरांचे नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण करण्याकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती संलग्न असलेला दुधाचा व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हाही या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करून शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्याचे उद्दिष्ट या योजनेमागे आहे शेतकऱ्यांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे काही उद्देश या योजनेमागे आहे.
राज्य सरकारच्या लक्षात आले की राज्यातील प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे गाई म्हशी बैल शेळी मेंढी या प्रकारची विविध जनावरे असतात परंतु त्यांना निवारा उपलब्ध नसतो व निवारा करण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे पैसे नसतात त्यामुळे शेतकऱ्याने जनावरांच्या निवाऱ्यासाठी कोणावर अवलंबून न राहता थेट या योजनेसाठी अर्ज करून गाय गोठा बांधण्यासाठी शासनाकडून मदत उपलब्ध करून घ्यावी त्या शेतकऱ्याला गाय गोठ्यासाठी कुन्हा कडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा किंवा तालुका स्तराला हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्याला होणाऱ्या आर्थिक नुकसानी पासून व शेतकऱ्याला त्याचे काम सोडून तालुका व जिल्हा येथे हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा हे दोन्हीही वाचणार आहेत. गाय गोठा योजना यामध्ये मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याला सहजरित्या त्याच्या जनावरासाठी गाय गोठा बांधण्यासाठी या योजनेतून मोठी मदत मिळणार आहे. गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जीवनमान सुधारण्यास तसेच शेतकऱ्यांना शेती संलग्न व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास निश्चित मदत होईल.
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
➤ शेतकर्याच्या जमिनीचा सातबारा व 8 अ चा उतारा
➤ शेतकर्याचे आधार कार्ड
➤ शेतकर्याचे राशन कार्ड
➤ गाय गोठ्यासाठी असलेला विहित नमुन्यातील अर्ज
No comments