कोरोणा काळात संधी साधली पडेगावला मिळाले तीस लक्ष रुपये.
कोरोणा काळात संधी साधली पडेगावला मिळाले तीस लक्ष रुपये.
गावकर्यांना सोबत घेऊन उपक्रम राबवले.
गावं करणार ते राव नाही करणार या म्हणीप्रमाने संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन अंतर्गत माझा गाव माझं तीर्थं या अभियानातून घडले सर्वकाही. गावकर्यांनी एकत्र येऊन कोरोना काळात संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन च्या मद्यमातून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव नावारूपास आले आहे. आर. आर. आबा सुंदर स्पर्धेत तालुका व जिल्हा या दोन्ही स्तरातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांकाचे बक्षीस रक्कम 30 लक्ष रुयाये एव्हढी आहे. हा प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे गावकर्यात ग्रामसुधारण्याच्या कामासाठी एकत्र येऊन श्रमदान करण्यास जास्त चेतना निर्माण झाली आहे.
गंगाखेड तालुक्यातील माळरानावर असलेले पडेगाव आज सुंदर सर्व सुविधा युक्त गाव बनले आहे. गावातील गावविकासाच्या कामासाठी नेहमी अग्रेसर असणारे होतकरू शिक्षक शाम सुंदर निरस यांच्या संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन अंतर्गत माझं तीर्थं या अभियानातून गावचा सर्वांगीण विकास करण्याची शपथ सर्व गावकरी मंडळी यांनी घेतली. लोकसहभागाच्या आणि लोक श्रमदांनाच्या बाळावर वेगवेगळी गावाच्या विकासाची कामे सुरू झाली. वृक्षा लागवड करून त्याचे संवर्धन करणे या कामापासून या गावात गाव विकासाची एक मोठी चळवळ चालू झाली. या माळरानावरील खडकाळ जमिनीत जवळपास दोन हजार झाडे लावून त्यांना जगवले. गावातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहावे गावात रोगराई पसरू नये या उद्देशाने हागनदारी मुक्त गाव हे अभियान राबवून या गावात विशेष महिलासाठी सार्वजनिक सौचालये बनवण्यात आले. स्मशान भूमीत वृक्षा लागवड करून तेथे मोठी बसण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली. गावातीला तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढवली. त्याच तलावात पाईपलाइन द्वारे पाणी साठवले जाते. त्यामुळे गावाची दुष्काळापासून मुक्ती झाली. गावात जे लोक निराधार आहेत त्यांना जगण्यासाठी उदर निर्वाहासाठी लागणारे साधने देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यात आले. शासनाच्या विविध योजनेविषयी सर्व गावकर्याला माहिती देवून जनजागृती करून लोकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम घडवून आणला किंवा लोकांचे जीवनमान सुधारले असे म्हणू
त्याचप्रमाणे शेतीविषयक मार्गदर्शन शिबिरे घेऊन फळबाग लागवड करण्यासाठी शेतकर्याला बळ दिले. त्यामुळे शेतकर्याची आर्थिक परिस्थिति सुधारण्यास मदत झाली. ग्रामपंचायत कार्यालयाने घंटा गाडी चालू करून गावातील घनकचरा व्यवस्थित मार्गी लावला. गावांतर्गत सर्व रस्ते बनवले काही कामे चालू आहेत या कामात परभणी जिल्ह्यातील बर्याचा दानशूर व्यक्तीचा मोठा वाटा आहे. पडेगावचे सरपंच श्री बोबडे ग्रामविकास अधिकारी श्री. खुपसे साहेब यांनी गावातील चालू झालेल्या युवकाच्या चळवळीला साथ देवून सर्वतोपरी मदत केल्यामुळे हे अभियान चांगल्या प्रकारे यशस्वी झाले. शासनाच्या आर. आर. आबा सुंदर स्पर्धेत पडेगाव जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रथम आल्याने गावाला 30 लक्ष रुपयाचे बक्षीस मिळाले. या पैशातून आणि शासनाच्या विविध योजनेतून गावात अभ्यासिकेसह गावाच्या सर्वांगीण विकासाची विविध कामे केली जाणार आहेत.
https://www.indianfaster.com/2023
Nice
ReplyDelete