Breaking News

एनर्जी ड्रिंक्स च्या नावाखाली कॅफेन हा घातक घटक असलेली थंड पेय बाजारात.

एनर्जी ड्रिंक्स च्या नावाखाली कॅफेन हा घातक घटक असलेली थंड पेय बाजारात.



सध्याच्या काळात एनर्जी ड्रिंक्स किंवा कोल्ड्रिंक्स पिणे ही एक मोठी फॅशन होऊन बसली आहे. सध्या सर्व स्तरातील लोक घराच्या बाहेर पडल्यानंतर कधीही अचानक लक्षात आले की एनर्जी ड्रिंक्स किंवा कोल्ड्रिंक्स पितात त्याचे कारण ते सहज कुठेही मिळते चहाचे हॉटेल, पान टपरी, किराणा दुकान किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सहजपणे उपलब्ध होतात. पण हे किती घातक आहे कोणाला माहित आहे का? आणि ते माहीत नसल्यामुळेच हे थंड पेय किंवा एनर्जी ड्रिंक्स लोक दिवसातून चार-पाच वेळा पितात. कोणाला साधा थकवा जाणवला की लगेच एनर्जी ड्रेस घेऊन पितात पण हे थंड पेय किंवा एनर्जी ड्रिंक्स शरीरासाठी भरपूर घातक आहे. हे सर्वांना माहीत होणे गरजेचे आहे. या कॅफेनयुक्त  पेयांना चार-पाच वेळेस पिले की, ते पिण्याची सवय लागते. कारण त्यामध्ये कॅफेन नावाचा घटक आहे. 

कॅफेन या घटकामुळे सौम्य प्रकारची नशा येते. लोक कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्स किंवा थंड पेय यांना सुरुवातीला टाइमपास किंवा फॅशन म्हणून पितात परंतु या पेयांना पाच-चार वेळेस पिल्यानंतर हे पेय पिण्याची सवय लागते. हे लोकांच्या लक्षात येत नाही. आणि सतत असे पेय शरीरात गेल्यास ते पिण्याची सवय वाढत जाते. आणि कालांतराने शरीरामध्ये कॅफेन या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास मेंदू, किडनी, मज्जारज्जू, शरीरातील हे अवयव निकामी होण्यास सुरुवात होते आणि कालांतराने हे अवयव निकामी होऊन माणूस दगावण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे लहान मुले गरोदर माता स्तनपान करणाऱ्या माता यांना तर कॅफेन हे सर्वात जास्त धोकादायक आहे, गरोदर माता ने अशा प्रकारची पे य थोड्या प्रमाणात जरी चार-पाच वेळा घेतले तरी तिच्या बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकालांगता येण्याची दाट शक्यता असते किंवा येतेच त्यामुळे गरोदर माता स्तनपान करणाऱ्या माता आणि लहान मुलांनी हे घेऊ नये याची खबरदारी बाळगावी.

पुढे वाचा 

कॅफेन युक्त थंड पेय किंवा एनर्जी ड्रिंक्स हे सहज कमी पैशात मिळत असल्याने उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा सहारा घेत आहेत. तसेच वाहन चालक झोप येऊ नये म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. किंवा सेवा करत आहेत याचे सेवन केल्यानंतर झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती निर्माण होते हे पिल्यानंतर बराच काळ बऱ्यापैकी गुंगी येते.

250 मिली च्या बाटली 75 मिली ग्रॅम पेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये अशी नोंदही अशा बॉटलवर असतात. या बाटल्यात प्रत्यक्ष शंभर मिली ला 29 मिलीग्राम असल्याची नोंद आहे. मात्र या बाटल्या थेट 250 मिली च्या आहेत एका दिवसात पाचशे मिली पेक्षा जास्त अशी पेय घेऊ नये असे तज्ञांचे स्पष्ट मत असले तरीही ते पेय लोक त्यांना सवय लागल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात पितात.


सर्व पालकांना विनंती आहे की आपल्याला लहान मुलांना असे कॅफेनयुक्त पेय किंवा कोणतीच कॅफेनयुक्त थंड पेय किंवा एनर्जी ड्रिंक्स पिण्यासाठी देऊ नये सध्या राज्यात अशा प्रकारची एनर्जी टॅक्स किंवा थंड पेय पिण्याची सवय लहान मुलांना पण मोठ्या प्रमाणात लागली आहे. त्यामुळे सर्व पालकांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या पाल्यांना यापासून दूर करून होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामापासून दूर ठेवावे.

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...