Breaking News

तुम्ही खालील गोष्टी करताय सावधान !

तुम्ही खालील गोष्टी करताय सावधान !

सावधान 


देशात ऑनलाईन गुन्हेगारी तेजीने आपले पाय पसरवत आहे. बर्‍याचा लोकांना अनोळखी नंबर वरुण फोन येतात ते मी बँक मधून बोलतोय तुमचे खाते बंद होणार आहे. तुमचे खाते बंद होण्यापासून वाचवायचे असेल तर मी विचारलेली माहिती सांगा असे बोलतात. आणि आपल्याला काही माहिती नसते त्यामुळे त्याने विचारलेली माहिती आपण सांगतो आणि तो सहज रित्या तुमच्या खात्यात असलेले सर्व पैसे काढून घेतो. त्याच पद्धतीने कोणाला SMS येतो खालील लिंकला टच करा आणि त्वरित कर्ज मिळवा आणि ते खरे ठरवून आपण तसे करो आणि त्या लिंकवर जी जी माहिती विचारली आहे ती माहिती आपण भरून मोकळे होतो. त्यामुळे त्याही कारणाने आपले बँक खाते रिकामे होते आशाचं अनेक कारणामुळे आपले पैसे पळवली जातात. त्यामुळे वैयक्ती रित्या काही गोस्टी ऑनलाईन करण्यापासून सावधान रहा आपण ऑनलाईन काय करू नये ते खालील प्रमाणे.

अधिक वाचा 
➤ OLX वर वस्तू खरेदी विक्री करू नये.
➤ कोणीही ऑनलाइन गुगलवर कस्टमर केअर, हेल्पलाइन नंबर शोधू नये. 
➤ कोणीही ऑनलाइन लोन घेऊ नये.
➤ कोणीही अनोळखी  व्हाट्सअप व्हिडिओ कॉल स्वीकारू नये .
➤ लाईट बिल रात्री कट होईल असे खोटे मेसेज ब्लॉक करावे.
➤ फेसबुक प्रोफाईल लॉक करावे, घरातले फोटो व्हिडिओ त्यात टाकू नये फक्त आपले मित्र आपले फोटो                 व्हिडिओ बघू शकतील असे करावे.
➤ आपले पासवर्ड डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नंबर सगळे एका रजिस्टर मध्ये घरी लिहून ठेवावे. 
➤ ऑनलाइन नोकरी सर्च करू नये.
➤ राजकीय पोस्ट कोणास ही पाठवू नये. 
➤ क्विक सपोर्ट, टीम viewer , एनी डेस्क मोबाईल ॲप डाऊनलोड करू नये, 
➤ ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तात्काळ सकाळी दहा ते सहाच्या दरम्यान 19 30 वर फोन करून माहिती द्यावी. 
➤ WWW. cybercrime.gov.in मेल पाठवावा. 
➤ वेब सिरीज जामतारा ,डिजिटल थिफ, रिटर्न ऑफ अभिमन्यू ध्रुवा हे चित्रपट बघावे काय चालू आहे आपल्या             लवकर लक्षात येईल.  .
➤ कोणीही बँकेतून बोलत असेल तर विश्वास ठेवू नये. आपली डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची केवायसी माहिती देऊ         नये स्वतः बँकेत जाऊन संपर्क साधावा .
➤ कोणतेही जिओ, एअरटेल, वोडाफोन यांची केवायसी ऑनलाईन करू नये.
➤ अश्लील लिंक, अनोळखी लिंक ओपन करू नये.
➤ कोणत्याही ॲप ला allow करू नये , deny करावे. 
➤ ऑनलाइन डिलिव्हरी ॲप बघु नये, तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वर आपली माहिती सेव करून ठेवू नये, ऑर्डर       देत असताना कॅश ऑन डिलिव्हरी करावे.
➤ एकच सारखा पासवर्ड प्रत्येकास देऊ नये ,सोपा पासवर्ड ठेवू नये, घरी पासवर्ड लिहून ठेवावे दर तीन महिन्यास       पासवर्ड बदलावा.
➤ डेबिट क्रेडिट कार्ड च्या मागे पासवर्ड लिहून ठेवू नये, मागील तीन अंकी cvv नंबर झाकून टाकावा. 
➤ आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू नये, आपल्या एचडीएफसी कार्ड च्या डेबिट कार्ड ला वायफाय असतो, 
➤ कोणतेही मशीनला स्पर्श झाल्यास दोन हजार रुपये वजावट होत असतात.
➤  एटीएम मशीन मध्ये पैसे काढत असताना स्वॅप मशीन बघावे, पासवर्ड झाकून टाकावा.
➤ मित्रांचा इंस्टाग्राम हॅक करून आपणास पैसै गुंतवणुकीचा फ्रॉड मॅसेज येणार. मित्रांच्या लिंक ला open करून         त्यात आपला ईमेल आयडी टाकू नये.
➤ मोबाईल मधील ॲप जास्त महिने वापरला नसेल डिलीट करावे.
➤ वर्तमान पेपर मधील घर बसल्या कामाच्या जाहिराती फसवणुकीच्या असतात, काम हवे असल्यास स्वतः त्या          ऑफिस मध्ये जावून चौकशी करावी.
➤ फेसबुक, इंस्टाग्राम, Google, OLX वरील वस्तु बघून विकत घेऊ नये. अनोळखी लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट                 स्वीकारू नये.
➤ काही व्यक्ती आपणास स्वतः हून आपल्या बँक अकाऊंट मध्ये पैसे पाठवुन फसवणुक करतात. त्यांना परत           त्यांच्या IFSC code व फक्त बँकेचा अकाऊंट विचारूनच पैसे ट्रान्स्फर करावे. एकवेळेस पोलीसांना भेटुनच           पुढील  कार्यवाही करावी.
➤ थर्ड पार्टी UPI वापरण्यापेक्षा म्हणजे गूगल पे, फोन पे, पेटीम वापरण्यापेक्षा फक्त बँकेचे QR code वापरून           पैश्यांची देवाण घेवाण करावी.
➤ मोबाईल मध्ये घरातील फोटो, व्हिडिओ ठेवु नये, ते सर्व पेन ड्राईव्ह मध्ये ट्रान्स्फर करावे, मोबाईल मध्ये आपले       महत्वाचे पासवर्ड, डॉक्युमेंट काहीच ठेवु नये.
➤ फेसबुक,इंस्टाग्राम वरील आपले प्रोफाईल एडिट करून only friend करावे, public, friends of friend करू         नये.
वरील सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे करण्याचे आपण स्वता: टाळून इतरांनाही त्याबदल माहिती देवून          आपले व इतराचे यापासून होणारे नुकसान टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे. 
 


https://www.indianfaster.com/2023

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...