आपल्या आधार कार्ड ला 10 वर्षे झाली ? मग ही बातमी वाचा
आपल्या आधार कार्ड ला 10 वर्षे झाली ? मग ही बातमी वाचा
जिल्हा परिषद पद भारती
सर्व देशवाशीयांसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. ज्या कोणाचे आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्णअथवा त्यापेक्षा अधिक वर्षे होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. ज्यांचे आधार कार्ड 10 किंवा त्यापेक्षा जुने असेल त्यांना आधार अपडेट करण्यासंबंधी युआडीएआयने महत्वाची घोषणा केली आहे. युआडीएआयने एजन्सीने नवीन सूचना दिल्या आहेत. आधार कार्ड धारकांना आधार कार्ड ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने कार्ड अपडेट करता येईल. आधार (Aadhaar Card) आजच्या काळात सर्वात महत्वाचा असा ओळखीचा पुरावा मानलाजात आहे. आधारकार्डची आवश्यकता अनेक सरकारी आणि बिगर सरकारी सर्व कामासाठी करण्यात येतो. त्यामुळे आधार कार्ड संबंधी ज्या काही वेळोवेळी वेगवेगळ्या याविषयीच्या सूचना येतात, त्यावर लक्ष ठेऊन त्या सूचनेप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी नवीन सूचना देते. आधार कार्डची एजन्सी UIDAI ने नुकतेच याविषयीचे एक म्हणणे मांडले आहे. त्यामध्ये त्यांनी नवीन माहिती दिली आहे. त्यानुसार, ज्या कोणा आधार कार्ड धारकाचे आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर अशा आधार कार्ड धारकला आपले आधार कार्ड अपडेट (Aadhar Update) करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड दोन प्रकारे अपडेट करता येणार आहे. तुम्ही आधारकार्ड ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून अपडेट करु शकता. ऑनलाईन माध्यमातून आधार अपडेट करण्यासाठी 25 रुपये तर ऑफलाईन पद्धतीने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येते. युआयडीएआयने आधार कार्ड अपडेट करण्या संबंधित नागरिकांना फसवेगिरी करणार्या फसव्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
रोजगार हमी योजनेमधून शेतकर्यांना मिळणारे लाभ
त्यांनी याविषयी असे म्हटले आहे की, आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी बातमी आली असे कळताच नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही फसवेगीर लोक नागरिकांची फसवणूक करून पैसे कमवण्याचे प्लॅन करत असल्याचे म्हटले आहे. ते वेगवेगळ्या फसवेगिरी करून पैसे कमवण्याची कल्पना लढवत आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणार्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती मग त्या मोबाईलवर आलेल्या मॅसेजवर, ईमेलवर विश्वास किंवा टेक्स्ट एसएमएस या सर्व माध्यमातून येणार्या अफवावर विश्वास ठेऊ नका असेआवाहन करण्यात आले आहे. अशा बदमासापासून सावधानता बाळगिण्याचा सल्ला युआडीएआय एजन्सीने दिला.
जर आधार कार्ड ऑफलाईन पद्धतीने अपडेट करायचे असेल तर तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. याठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करता येईल. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राची यादी पाहून त्याप्रमाणे जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्रावती जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता . किंवा आपल्याकडे मोबाइल असेल तर त्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअरमधून उमंग नावच्या ॲप डाऊनलोड करून त्याद्वारेही तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करू शकता.
अशा प्रकारे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पर्याय आहेत आधार कार्ड तुम्ही तुमच्या सोईनुसार कोणत्याही प्रकारे अपडेट करू शकतात.
विहीरीसाठी शेतकर्याला आता 4 लाख रुपये अनुदान
पण हे लक्षात ठेवा की तुमचे आधार कार्ड दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक दिवसाचे असेल तरच आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे. दहा वर्षाच्या आतील आधार कार्ड असेल तर त्याला अपडेट करण्याची गरज नाही यआधार कार्ड अपडेट करण्यासाठी रहिवासी पुरावा आणि एक फोटो पुरावा असले तरीही चालते म्हणजे मतदार ओळखपत्र असेल तर आधार अपडेट करता येईल.
No comments