"शासकीय योजनांची जत्रा" या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी विभागीय आयुक्त - सुनील केंद्रेकर

"शासकीय योजनांची जत्रा" या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी विभागीय आयुक्त - सुनील  केंद्रेकर 



    मराठवड्यातील शेतकर्‍याच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती आणि शासकीय योजना याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी "बळीराजा सर्वे ॲप" बळीराजा सर्वेक्षण करताना संबंधित अधिकारी - कर्मचारी यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी केले. शासकीय योजनांची जत्रा" या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे निर्देशही त्यांनी दिले. वंदे मातरम 2 सभागृह येथे मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियाना अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा व बळीराजा सर्वेक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित बैठकीत. श्री. केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे हे उपस्थित होते. श्री. केंद्रेकर म्हणाले मराठवाड्यातील शेतकर्‍याच्या सर्वेक्षणासाठी बळीराजा सर्वे ॲप तयार करण्यात आले. आहे. 

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतकरी बांधवाची प्रगती तसेच जीवनमान सुधारण्यासाठी आवस्यक त्या उपाययोजना करण्यासाठी मदत मिळेल. सर्वेक्षण झाल्या नंतर विशेष करून शासनाकडे एकत्रीत अहवाल सादर केला जाणार आहे. 


त्यामुळे सर्वेक्षण करताना गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, या यंत्रणेपासून ते थेट जिल्हाधिकार्‍यानेही यामध्ये सभाग नोंदवावा. मराठवड्यातील काही जिल्ह्यात सर्वेक्षण जलद गतीने सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. दुष्काळ, पाणीटंचाई तसेच नैसर्गिक संकटाचा शेतकर्‍याला सामना करावा लागत असतो. शेतकर्‍याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट शेतकर्‍याच्या बांधावर जावे. बळीराजा सर्वेक्षंनातून भविष्यातील अडचणी समजतील व त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतील. सर्वेक्षंन करताना अचूक सर्वेक्षंन होणे गरजेचे असल्याचे श्री. केंद्रेकर म्हणाले. शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यन्त शासकीय योजनांचा लाभ पोहचवण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे. अशा सूचना श्री. केंद्रेकर यांनी दिल्या. संभाजी नगरचे जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय म्हणाले लाभार्थ्याना जलद कमी कागदापत्रामध्ये आणि शाकिय शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनाचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ  उद्देश या जत्रेचा आहे. गावातील शेवटच्या घातकापर्यंत शासकीय योजनाचा लाभ पोहचला जावा या हेतूने शासकीय योजना सोप्या करण्यासाठी हे अभियान राबण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यात जिल्ह्यात पात्र लाभार्थ्याना थेट लाभ उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अभियानाचे सात टप्यात नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी करताना सुसूत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विभागणीहाय नियोजन केले आहे. या अभियांच्या गतिमान अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा जन कल्याण कक्ष असणार आहे. शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाच्या माध्यमातून योजनाचा लाभ सर्वांना पोहचला पाहिजे. प्रत्येक गावनिहाय, तालुकानिहाय नियोजन आराखडा तयार करावा. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनाचा आराखडा तयार करावा वैयक्तिक, सामूहिक लाभाच्या योजनाचा लाभ या माध्यमातून दिला जाणार आहे. . हे अभियान मिशन मोडवर राब्विळे जाणार असल्याचे श्री. पाण्डेय म्हणाले बळीराजा सर्वेक्षण ॲपच्या माध्यमातून गावपातळीवर सर्वे करताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सर्वेक्षंन करताना नियोजन फार महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाची आर्थिक , सामाजिक स्थितीबाबत मोबाइल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. एकही कुटुंब या सर्वेतून सुटणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या जलजीवन मिशन, अमृत महाआवास, मनरेगा, शिष्यवृत्ती, दिव्यांग बांधवासाठी अस्लेल्या योजना, समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती दिली.

मानपाचे अतिरिक्त आयुक्त रंजीत पाटील यांनी नगरपालिका, महानगरपालिका माध्यमातून राबवण्यात येणार्‍या योजना विषयी माहिती दिली. प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी केले. शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाची रूपरेषा, जबाबदारी, लक्ष, कार्यक्रम व टप्पे सदरीकरनाबाबत माहिती दिली. लोककल्याणकारी योजनाचा लाभ सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहचवण्यासाठी हा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी हाती घेतला आहे.  

 

No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...