रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करायच्या त्याबद्दल युवकांना मार्गदर्शन शिबीर
रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करायच्या त्याबद्दल युवकांना मार्गदर्शन शिबीर
जिल्ह्यात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांच्या वतीने दि. 16 एप्रील 2023 रोजी धारूर जिल्हा बीड येथील नगारपरिषद नाट्यगृह येथे ब्लॉगिंग काय आहे ब्लॉग कसे बनवायचे त्याला प्रसिद्ध कसे करायचे या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ब्लॉगिंग या विषयाचे सविस्तर मार्गदर्शन मिळून युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच रोजगार उपलब्ध होऊन युवक स्वावलंबी होण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. असे सुरेश गवळी यांनी संगितले.
ब्लॉगिंग विषयाच्या या शिबिराला मार्गदर्शन करण्याससाठी ब्लॉगिंग या क्षेत्रात नावारूपाला आलेले आपले बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र अक्षय रासकर सर हे आपला अमूल्य वेळ खर्च करून येणार आहेत.
संगणकीय युगामध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कामावण्याचे अनेक पर्याय आहेत. मात्र या पर्यायाचे प्रशिक्षण असणे महत्वाचे असते. अशाचा प्रकारचे काही मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून ब्लॉक बनवणे या या संदर्भात धारूर जिल्हा बीड यथे प्रशिक्षण शिबिराचे दि. 16 एप्रील 2023 रोजी येथील नगारपरिषद नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून होतकरू तरुणांना रोजगार निर्मितीचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे या शिबिरचा जास्तीत जास्त युवकाने लाभ घेण्याचे आवाहन आयोजक सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केले आहे.
👌
ReplyDelete