महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून गावातील स्वच्छता ठेवण्यासाठी चार मजूर लावण्याची परवानगी द्यावी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून गावातील स्वच्छता ठेवण्यासाठी चार मजूर लावण्याची परवानगी द्यावी.
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांची शासनाकडे मागणी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी चार मजूर लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी १८/०८/२०२२ रोजी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष काकडे यांची शासनाकडे केली होती. या विषयावर नरेगा कक्ष अधिकारी एका पत्रांनुसार नियोजन विभाग जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगनवाड्या परिसर, गावातील रस्ते, चौक, सर्वजनिक सभागृह, समाज मंदिर, गावातील नाल्या स्वच्छता करणे त्यांची फवारणी करणे ई. बाबींची स्वच्छता करून घेण्यासाठी गावातील गरजू चार मजूर लावण्याची ग्रामपंचायतीला परवानगी द्यावी असी मागणी केली होती.
अधिक वाचा
याबाबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्राची योजना असून ही योजना राबवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना दिल्या जातात त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी राज्यात केली जाते किंवा त्यानुसार ही योजना राज्यात राबवली जाते. केंद्र सरकारने ठरवून दिलेली कामेच या योजनेमधून राज्याला करावी लागतात. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगनवाड्या परिसर, गावातील रस्ते, चौक, सर्वजनिक सभागृह, समाज मंदिर, गावातील नाल्या स्वच्छता करणे त्यांची फवारणी करणे ई. बाबींची स्वच्छता करून घेण्यासाठी गावातील गरजू चार मजूर लावण्याची तरतूद आजपर्यन्त या योजनेत नाही. अशी माहिती मिळाली. त्यामुळे या संदर्भात आपण केंद्रिय रोजगार हमी मंत्र्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष काकडे काकडे यांनी संगितले.
https://indianfaster123.blogspot.com/2023
No comments