Breaking News

सुधारित शेती करून भक्कम उत्पन्न काढण्यासाठी शासनाच्या लाभदायक योजना

सुधारित शेती करून भक्कम उत्पन्न काढण्यासाठी शासनाच्या लाभदायक योजना 



           आजच्या काळात शेतकर्‍याला सर्व बाजूने वाईट दिवस आले आहेत. त्याचे कारण शेती करण्यासाठी लागणारे सर्व साहिती जसे की, खते, बी - बियाणे फवारणी करण्यासाठी लागणारे औषधे यांच्या गगनाला अभिडलेल्या किंमती तसेच शेतीची मशागत करण्यासाठीचा खर्च असा वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करून शेतकरी आपल्या जमिनीत पीक लागवड करीत असतो. परंतू पिकं लागवड केली म्हणजे पीके तयार झाली असा नाही नंतर जर निसर्गाने साथ दिली तर कसे बसे पिके निघतात. बर जर पीक चांगले आले तर त्याला भाव मिळत नाही. आणि जर निसर्ग कोपला तर मग शेतकरी डबल कर्ज बाजारी. 
                                             म्हणून शेतकर्‍याने शासनाच्या शेतीविषयी असलेल्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊन शेती करण्यासाठी होणारा खर्चात बचत  करून व सुधारित तंत्रज्ञान वापरुन शेती करावी करिता शासनाच्या कृषि विभागामार्फत काही योजना आहेत. 


रोजगार हमी योजनेमधून शेतकर्‍यांना मिळणारे लाभ

1    कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य 
      ➤ काढणी पश्चात तंत्रज्ञान 
      ➤ ट्रॅक्टर 
      ➤ ट्रॅक्टर चलित औजारे 
      ➤प्रक्रिया संच 
      ➤ Powar टिलर
      ➤ बैल चलित औजारे 
      ➤ मनुष्य चलित औजारे 
      ➤ स्वयं चलित औजारे 

2     सिंचन सुविधेसाठी अर्थसहाय्य
       ➤इंजिन 
       ➤इलेक्ट्रिक मोटर
       ➤उपसा सिंचन 
       ➤ठिबक सिंचन प्रणाली 
       ➤तुषार सिंचन प्रणाली 
       ➤पाइपलाइन 
       ➤रेनगन 

3     पालोत्पादन सुविधेसाठी अर्थसहाय्य
      ➤एकात्मिक पोषकद्रव्य व कीड व्यवस्थापन 
      ➤कांदाचाळ, पॅकहाऊस 
      ➤फळ, फूल, मसाले व सुगंधित पीके यांची बाग लागवड 
      ➤भाजीपाला रोपवाटिका 
      ➤सेंद्रिय शेती 
      ➤हरितगृह, शेडनेट हाऊस 

                    वरील योजनेचा लाभ घेऊन शेतकर्‍यांने शेती करण्यासाठी लागणारी जास्तीची मेहनत व जसतीचा पैसा व वेळेची बचत करावी 
        वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेब साईटला भेट देऊन योजनेसाठी अर्ज करावा .
   

                                       


No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...