असा बदलू शकता PM किसान योजनेचा बँक खाते नंबर
असा बदलू शकता PM किसान योजनेचा बँक खाते नंबर
सरकार देणार एक लाख रुपये
How to Change Bank Account PM kisan Yojna
भारतातील पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे देशातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दोन हजार रुपये प्रत्येक चार महिन्याला मिळत असतात परंतु काही कारणास्तव काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणारी बँक बदलायची असते म्हणजेच शेतकऱ्यांना सध्याच्या बँकेच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये हप्ता जमा होतो त्या बँकेमध्ये तो हप्ता जमा न होता त्या शेतकऱ्याला दुसऱ्या बँकेमध्ये जमा करायचा असतो परंतु काही अडचणीमुळे आतापर्यंत असे होत नव्हते पण, आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याला त्याचा दोन हजार रुपये हप्ता ज्या बँकेमध्ये घ्यायचा आहे त्या बँकेमध्ये घेऊ शकतो असे करणे आता झाले सोपे.
शेतकर्याला आता 4 लाख रुपये अनुदान
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे येतात ते पैसे डीबीटी च्या माध्यमातून येत असतात म्हणजेच शेतकऱ्याच्या ज्या बँक खात्याला त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चे दोन हजार रुपये जमा होतात हे पैसे आधार NPCI च्या माध्यमातून बँकेत जमा होतात या आधार NPCI ला कोणत्याही फक्त एकच बँक अकाउंट लिंक होत असते शेतकऱ्याचे च्या बँक खात्याला आधार NPCI लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे येत असतात परंतु जर काही शेतकऱ्यांना ते बँक खाते बदलायचे असेल तर किंवा त्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे नको असतील तर त्यांना बँक खाते कसे बदलायचे याची संपूर्ण माहिती किंवा प्रक्रिया पुढील प्रमाणे करावे ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे यासाठी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून पहा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चे शेतकऱ्याला जर बँकेचे खाते नंबर बदलायचे असेल किंवा पाहिजे त्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करायचा असेल तर शेतकऱ्याला ज्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता यावा असे वाटत असेल त्या बँकेमध्ये जाऊन संबंधित बँक कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला भेटून माझे खाते नंबर आधार NPCI ला लिंक करा असे संबंधित बँक कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला सांगा म्हणजे शासनाचे कोणत्याही प्रकारचे किंवा कोणत्याही योजनेद्वारे येणारे पैसे डीबीटी मार्फत शेतकऱ्याच्या त्या बँक खात्यामध्ये जमा होतात
शेतकरी बँकेमध्ये जाऊन अधिकाऱ्याला भेटून बँक अकाउंट ला आधार NPCI ला लिंक करा हे जर बँक कर्मचाऱ्याला समजत नसेल किंवा समजले नाही तर तुम्ही त्या बँकेच्या शाखाधिकार्याशी बोलू शकतात बँक शाखाधिकार्याला आधार NPCI बद्दल बोलल्यानंतर शाखाधिकारी तुम्हाला त्याबद्दलचा एक फॉर्म देतील तो अर्ज तुम्ही सविस्तर भरून बँक शाखाधिकार्याला द्यायचा आहे जर तो फॉर्म किंवा अर्ज तुम्हाला बँकेकडे मिळाला नाही किंवा उपलब्ध नसेल तर तो अर्ज तुम्ही स्वतः ऑनलाईन डाउनलोड करून किंवा शेतकऱ्याला तो अर्ज
ऑनलाइनच्या कुठल्याही शॉप वर उपलब्ध होईल तो अर्ज भरून त्याला बँकेच्या पासबुक जीवन आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडून तो अर्ज बँकेत जमा करायचा आहे तो अर्ज बँकेत जमा केल्यानंतर बारा ते पंधरा दिवसांमध्ये त्या शेतकऱ्याचे अकाउंट आधार NPCI ला लिंक होईल व त्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा येणार आहात का त्या खात्यामध्ये जमा होईल किंवा शासनाच्या कोणत्याही योजनेचा येणारा लाभ त्याच खात्यामध्ये जमा होईल याप्रमाणे सर्व प्रक्रिया व्यवस्थित रित्या शेतकऱ्याला पार पाडावी लागेल.
No comments