काय आहे कुसुम सोलार योजना
काय आहे कुसुम सोलार योजना
PM किसान योजनेचा बँक खाते नंबर
How to Apply for Kusum Solar Yojana
आपला देश अजूनही पारंपारिक ऊर्जा निर्मितीच्या श्रोतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे पारंपारिक ऊर्जा निर्मिती स्त्रोत म्हणजे कोळशापासून ऊर्जा निर्मिती खनिज तेलापासून ऊर्जा निर्मिती या प्रकारच्या खनिजावर आपला देश जास्त प्रमाणात ऊर्जा निर्मिती करत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे प्रदूषण होते. आणि कालांतराने आपले पारंपारिक ऊर्जा निर्मितीचे स्रोत संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन पूजा निर्मितीच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कुसुम सौर योजना आणि या प्रकारचे बरेच उपक्रम सुरू केले आहेत. त्यापैकीच कुसुम सौर योजना ही एक योजना भारत सरकार राबवत आहे.
कुसुम सौर योजना या योजनेला भारत सरकार प्राधान्याने राबवत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला चालना देऊन शेतकऱ्यांना ही योजना जास्तीत जास्त वापरण्यासंबंधी माहितीपूर्ण आणि त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे हा आहे.
या योजनेमधून शेतकऱ्यांना स्वतःच्या वापरासाठी सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आणि अतिरिक्त वीज राज्य वीज बीडला विकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आणि त्यांच्या शेतीला लागणाऱ्या साधनांच्या वापरासाठी सौर पंप सौर पॅनल आणि त्यासोबतचे इतर उपकरणे बसवण्यासाठी शासन शेतकऱ्याला आर्थिक मदत करते व हे साहित्य वितरण करणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्याकडून त्यांच्या शेतीला लागणाऱ्या विजेच्या अतिरिक्त झालेल्या सौर ऊर्जा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन पण देते.
सरकार देणार एक लाख रुपये
सरकारच्या कुसुम सौर योजनेची उद्दिष्टे
➤ कृषी क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला चालना देणे त्याचप्रमाणे रॉकेल डिझेल पेट्रोल आणि विज यासारख्या पारंपारिक ऊर्जा स्वतःवर शेतकऱ्यांनी अवलंबून राहू नये आणि नवीकरणीय ऊर्जेच्या वापरास चालना देणे.
➤ सौर ऊर्जा निर्माण करून आणि निर्माण झालेल्या अतिरिक्त ऊर्जा राज्य क्रीडा विकून शेतकरी त्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळून ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होऊ शकते किंवा मदत होईल तसेच राज्य वीज महामंडळावरील लागणाऱ्या ऊर्जेचा भार कमी करण्यास मदत होईल.
➤ शेतकऱ्यांना स्वतः वीज निर्मिती करण्यास मदत करून करून राज्य वीज महामंडळावरील वीज निर्मितीचा भार कमी करणे ही या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कुसुम सौर योजनेमुळे होणारे फायदे
➤ पारंपारिक ऊर्जा निर्मितीमुळे देशात होणारे प्रदूषण या योजनेमुळे किंवा सौर ऊर्जा निर्मितीमुळे कमी करता येते.आणि प्रदूषण कमी झाल्यास हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत होते.
➤ या योजनेमुळे किंवा सौर ऊर्जा निर्मितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत मिळते.
➤ त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे सौर पंप आणि इतर उपकरणांच्या वापरामुळे कृषी क्षेत्राची कार्यक्षमता वाढवू शकते त्यामुळे पूजा वापराच्या पारंपारिक स्वतःवर जास्त अवलंबून राहण्याची गरज राहत नाही.
➤ कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देते त्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवून त्यासाठी लागणारा खर्च कमी करण्यास मदत मिळू शकते.
कुसुम सौर योजनेसमोर असणारी आव्हाने
➤ देशातील बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेच्या फायद्याबाबत माहिती नसते आणि त्यामुळे ते यासारख्या चांगल्या योजनेचा लाभ घेण्यास किंवा लाभ घेण्यापासून वंचित राहतात.
➤ सौर पंप आणि पॅनलच्या उभारणीसाठी जास्तीचा खर्चाची गरज असते अनेक शेतकऱ्यांसाठी न परवडणारे आहे.
➤ त्याचप्रमाणे सर पॅनलच्या स्थापनेसाठी जास्त प्रमाणात जमिन लागते जी काही शेतकऱ्याकडे मर्यादितच असते.
➤ सौ उपकरणांना नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्याची गरज असते जे बऱ्याच शेतकऱ्यांसाठी महागाचे असते किंवा नो परवडणारे असते.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कुसुम सौर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राज्य नोडल एजन्सी किंवा जवळच्या वीज वितरण कंपनीशी संपर्क साधू शकतात वरील प्रकारच्या दोघांनाही अर्ज प्रक्रियेबद्दल आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन आपणास मिळेल.
कुसुम सौर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर शेतकरी मार्गदर्शक तत्वे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि प्रत्येक राज्यातील नोडल एजन्सी व वीज वितरण कंपन्यांचा सर्व तपशीलासह या योजनेची सर्व माहिती शोधू शकतात.
कुसुम सौर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे म्हणजे जमिनीच्या मालकीची कागदपत्रे जसे सात बारा, आठ अ, विज बिल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा तपशील याप्रमाणे माहिती द्यावी लागेल. नोडल एजन्सी किंवा वीज वितरण कंपनी या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून या प्रकल्पाच्या व्यवहाराचे मूल्यांकन करण्यासाठी ही योजना मंजूर झाल्यानंतर शेतकरी सौर उपकरणे बसवण्यास पात्र ठेवू शकतात. कुसुम सौर योजना ही एक स्पर्धात्मक बोली प्रक्रिया आहे आणि अनुदानाची रक्कम निधीची उपलब्धता आणि बोली प्रक्रियेच्या परिणामांच्या आधी राहून आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन साईट चालू झाल्यानंतर लवकरात लवकर आणि वेळेवर अर्ज सादर करावा किंवा वेळेवर ऑनलाईन अर्ज दाखल करावा.
ही योजना शेतकऱ्यांनी स्वतःची स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा करून देशाच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांमध्ये स्वतःचे योगदान देऊन प्रकारे मोठ्या देश सेवेमध्ये हातभार लावण्याची संधी आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी केवळ त्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीत तर सुधारित शेती पद्धतीने प्रोत्साहन देऊन देशांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यास हातभार लावता येणारी योजना आहे.
No comments