Breaking News

जलसिंचन विहीरीसाठी शेतकर्‍याला आता 4 लाख रुपये अनुदान.

जलसिंचन विहीरीसाठी शेतकर्‍याला आता 4 लाख रुपये अनुदान.


शेतकरी बांधवासाठी आता शासनाचा महत्वाचा निर्णय. 


 ट्रॅक्टर खरेदी योजना

राज्यामध्ये अजून असे बरेच शेतकरी आहेत की, त्यांना शेती तर आहे परंतु त्यांना शेती करण्यासाठी नैसर्गिक पाण्यावर म्हणजे पावसावर अवलंबून राहावे लागते कारण त्यांच्याकडे शेती असते परंतु त्यांना कायमस्वरूपी सिंचनाचा स्रोत नसतो किंवा सिंचनाचा स्त्रोत उभा करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नसते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना शेती असून सुद्धा शेतीमध्ये व्यवस्थित उत्पन्न घेता येत नाही. कारण पावसाच्या पाण्यावर करणे म्हणजे एक प्रकारचा जुगार असतो. कोणते ही पीक पेरणी केल्यापासून त्या पिकाला निघेपर्यंत पाण्याची आवश्यकता असते. आणि ती आवश्यकता म्हणजे प्रत्येक पिकाला पाणी देण्याच्या काही संवेदनशील अवस्था असतात त्यावेळी जर पिकाला पाणी मिळाले तरच ते पीक चांगले येते. आणि पाऊस पिकाला ज्यावेळी पाण्याची आवश्यकता असेल त्याच वेळी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे अवेळी येणाऱ्या पावसामुळे पिकाचे नुकसान होते. आणि शेतकऱ्याचे उत्पन्न पाहिजे तसे येत नाही. म्हणून शासनाकडून महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून शेतकऱ्यांना त्याच्या सिंचन व्यवस्थेसाठी विहिरीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने मधून शेतकऱ्यांना विहीर अनुदान देण्यात येत होते. पहिले ते दोन लक्ष इतके होते. कालांतराने त्यामध्ये बदल होऊन परत त्यामध्ये वाढ करून अनुदानाची रक्कम तीन लक्ष एवढे करण्यात आली. परंतु शासनाच्या असे लक्षात आले की या रकमेमध्ये शेतकऱ्यांना विहीर खोदकाम करण्यास अडचणी निर्माण होत आहे म्हणजेच तीन लक्ष इतकी रक्कम विहीर करण्यासाठी पुरेशी नाही म्हणून नुकताच शासनाकडून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना जलसिंचन विहीर खोदकामासाठी व बांधकामासाठी चार लाख रुपये इतके अनुदान  देण्याचा निर्णय झाला.

ऊसतोड कामगारची नोंदणी

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मधून जलसिंचन विहीर खोदकाम व बांधकाम करण्यासाठी मिळनार्‍या अनुदानास पात्र लाभार्थी शेतकरी.

➤ ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबा त कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त पाच एकर जमीन असेल असे शेतकरी 

➤ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबात शासकीय नोकरदार नसावा. 

➤ त्या कुटुंबातील सदस्याने या आधी या योजनेचा लाभ घेतलेला असू नये .

➤ या योजनांचा लाभ घेण्यासाठी विधवा, अपंग महिला किंवा पुरुष यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मधून जलसिंचन विहीर खोदकामासाठी अनुदान मिळण्याकरिता शासनाकडून बऱ्याचशा नियम व अटी यांना शिथील करून आता या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकरी असेल तर, माघेल त्या शेतकऱ्याला जलसिंचन विहीर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मधून सिंचन विहीर या कामासाठी मतदान घेण्याकरिता किंवा जलसिंचन विहीर मंजूर करून घेण्याकरिता अर्ज कोठे करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होतो तर त्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन जलसिंचन विहीर अनुदानासाठी अर्ज करावा. त्या अर्जावर ग्रामपंचायत कार्यालय योग्य ती कार्यवाही करून पंचायत समितीकडे पाठवते व पंचायत समितीकडून त्या शेतकऱ्याच्या जलसिंचन विहीर खोदकामासाठी योग्य ती कार्यवाही करून मंजुरी मिळते पंचायत समिती कार्यालय कडून मंजुरी मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला जलसिंचन विहीर खोदकामासाठी काम चालू करण्याची परवानगी असलेले पत्र मिळते नंतरच शेतकऱ्यांनी विहिरीचे काम चालू करून दिलेल्या नियमानुसार विहिरीचे काम चालू असताना टप्प्याटप्प्याने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळण्यास चालू होते. व काम पूर्ण झाल्यानंतर  उरलेली अनुदानाची रक्कम काही दिवसातच लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होते.


No comments

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये मोठा बदल  नवीन योजना पाहण्यासाठी येथे टच करा                 Mukhyamantri Sahayta Nidhi Yojana  महारा...